top of page

इंदापूर तालुक्यामध्ये भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

  • iyfpandharpur
  • Nov 17, 2017
  • 1 min read

इस्कॉन पंढरपूर व बेस संघ(इंजिनिरांचा ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यामध्ये भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा जानेवारीच्या(2018) पहिल्या आठवड्यात होणार आहे .

या परीक्षेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे तसेच त्यांच्यामध्ये गुण आणि मूल्यांची जोपासना करणे हे आहे . याशिवाय या धावपळीच्या जीवनात आपले मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवण्याबरोबरच जीवन जगण्याची कला याविषयीचे ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे .

परीक्षा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये होणार आहे. या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे ५० हजार रुपयांची बक्षिसे ठेवण्यात अली आहेत.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पालकांनी व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रोहत्सान द्यावे.


 
 
 

Kommentare


Featured Posts
Recent Posts
Search By Tags
Follow Us
  • Facebook Classic
  • Twitter Classic
  • Google Classic
bottom of page