top of page

भगवतगीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१६ आयोजित

मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच गुण आणि मुल्यांची जोपासना व वृद्धी व्हावी यासाठी आय वाय एफ पंढरपूर (इस्कॉन युवा मंच पंढरपूर) च्या वतीने भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षा २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे . आजचे विध्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत हे लक्षात घेऊन आय वाय एफ पंढरपूर या समाजसेवी संघाने विशेष प्रयत्न सुरु केले आहेत . या परीक्षेमुळे मुलांची एकाग्रता , संयम , सकारात्मक दृष्टीकोन ,सेवाभाव , भावनिक आणि अध्यात्मिक बुद्ध्यांक वाढण्यास मदत होईल .

ही परीक्षा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे . ही परीक्षा १०० गुणांची (बहुपर्यायी प्रश्न) मराठी आणि इंग्रजी माध्यमातून होणार आहे . या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी सुमारे ८०,०००/- रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या अधिक माहितीसाठी www.iyfpandharpur.wix.com/lotous या संकेतस्थळाला भेट द्या.


Featured Posts
Recent Posts
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Classic
  • Twitter Classic
  • Google Classic
bottom of page